सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज कॉन्सील हॉल येथे साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होत. प्रथम सुरुवात साने गुरुजी यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तविक सहा.आयुक्त गिरीष पंडित यांनी केली. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या सख्याने उपस्थित होते.
या उपस्थिती असलेल्या मधून 11 लकी ड्रॉ मधून नावे काढण्यात आले त्या सर्व 11 अधिकारी व कर्मचारी यांना साने गुरुजी लिखित शामची आई हे पुस्तक भेट देण्यात आले.
त्यानंतर उपायुक्त आशिष लोकरे यांनी साने गुरुजी हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक तसेच विध्यार्थी घडविण्यामध्ये गुरुजीचा अमूल्य योगदान होते अश्या विविध विषयावर माहिती दिले.
अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी साने गुरुजी यांनी लिहिले कविता, त्यांनी सुरु केलली विध्यार्थी मासिक, स्वावलंबनाचे धडे त्याचं बरोबर साने गुरुजी हे सर्व भावी पिढ्यासाठी दीपस्तभ आहेत असे सांगत कार्याची माहिती दिली. तसेच यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी उपस्थितीनां मार्गदर्शन केले. व साने गुरुजी यांनी लिहिले शामची आई पुस्तकं मूल्य शिक्षणाचे भंडारा आहे.
यावेळी कार्यमामचे आभार सहा. आयुक्त शशिकांत भोसले यांनी केलं. या कार्यक्रमस नगर सचिव प्रवीण दंतकाळे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, महेश क्षीरसागर, नंदकुमार जगदनी, कामगार कल्याण ओमप्रकाश वाघमारे, कर सकलन प्रमुख युवराज गाडेकर, सामान्य प्रसासन विभागाचे रजाक पेंढारी, उद्यान अधिक्षक किरण जगदाळे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.