सोलापूर : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते प्रविण प्रकाश वाले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावले.
माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील प्रवीण वाले यांना मानाचा फेटा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या सत्कार प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, प्रवीण वाले यांनी विधानसभेत चांगले काम केले लवकरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, येणाऱ्या काळात भाजपकडून त्यांना नक्की न्याय देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सत्कार ला उत्तर देताना युवा नेते प्रवीण वाले म्हणाले, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात काम करणार असून येणाऱ्या काळात अधिक गतीने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणार अशी ग्वाही दिली.
यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, बाळासाहेब मुस्तारे, तम्मा मसरे, बिपिन धुम्मा, सुभाष मुस्तारे, नरेंद्र गंभिरे, अण्णासाहेब कोथली, गौरीशंकर वाले, उमाशंकर वाले, आणि प्रभागातील नागरिक व प्रविण प्रकाश वाले मित्रपरिवार उपस्थित होते.