सावित्री फुले या सामाजिक सुधारणा चळवळीतील महत्त्वाची व्यक्ती : प्रशांत बाबर

सोलापूर : प्रतिनिधी
स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर कार्यालय येथे महिला उपाध्यक्षा वंदनाताई भिसे व युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना बाबर म्हणाले की, सध्या भारतामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, परंतु काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. मुख्यत्वे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मात्र त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज भारतामधील मुली मुक्तपणे शिक्षण घेत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या चळवळीमुळेच भारतामधील महिला विविध क्षेत्रात मोठी प्रगती करत आहेत. त्या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
सदर प्रसंगी शहर उपाध्यक्ष विजय भोईटे, व्ही.जे.एन.टी अध्यक्ष मोहम्मद इंडीकर, लक्ष्मण भोसले, बिरप्पा बंडगर, चंद्रकांत लोंढे, स्वप्नील भिसे, लखन गावडे, अक्षय जाधव, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू, शक्ती कटकधोंड आदि उपस्थित होते.