करूणाशिल समितीचे महाथेरी सन्मान पुरस्कार जाहिर

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था संलग्न करूणाशील समिती सोलापूर यांच्या वतीने शहर जिल्ह्यातील मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या सामाजिक सेवेचा गौरव म्हणून १२ कर्तृत्ववान महिलांना देण्यात येणाऱ्या पहिल्या महाथेरी सन्मान पुरस्कार ची घोषणा अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी केली.

येत्या येत्या शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सकाळी ११ वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ लेखिका माया नरेश बदनोरे यांच्या हस्ते व सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होत असून यावेळी ज्येष्ठ समाजसेविका शेवंताबाई सौदागर मोरे , इंदुमती लक्ष्मण कांबळे ,माजी महापौर अलका दगडू राठोड, ज्येष्ठ समाजसेविका नागरबाई मल्हारी बनसोडे ,कालमा यल्लाप्पा मंडेपु, आशा उत्तम रोकडे- कीर्तीकर, संध्या धर्माधिकारी, जेष्ठ धम्म उपासिका धम्मरक्षीता मधुकर कांबळे, डॉ. सुरयया परविन सय्यद, मंगला अभिमन्यू बंगाळे, सुचित्रा विठ्ठल थोरे, मनीषा केशव माने यांचा सन्मान केला जाणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कवी मारुती कटकधोड, डॉ. राजू मोहोळकर, प्रफुल्ल सोनवणे, राहुल बाबरे ,प्रा. विवेक चंदालिया ,सुनिता गायकवाड, प्रथमेश सोनवणे, तृप्ती सोनवणे, मनोज शिंदे, विनोद वाघमारे, प्रवीण राजगिरे, मनिष सुरवसे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!