सोलापूर : प्रतिनिधी
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंती निमित्त जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था, सोलापूर यांच्या वतीने संगमेश्वर कॉलेज, सात रस्ता येथे मध्यवर्ती जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या नववर्षा रंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधीवत पूजन व आरतीने करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उद्योगपती विजयकुमार बकरे, प्रभाग क्रमांक १३ चे भाजप नगरसेवक विजय चिप्पा, संत वीरशैव कक्कया संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र होटकर, जी.के. मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड, सहाय्यक नियोजन अधिकारी यशपाल गवळी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चार्टर्ड अकाउंटंट सागर बेरूनगी व दिग्विजय शिंदे होते. यावेळी सो.पा. युसिडीचे प्रमुख शशिकांत वाघमारे, शिव स्वराज्य संघचक्र अध्यक्ष काकासाहेब जाधव, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र रमेश रणखांबे, समाजसेवक खंडू लांबतुरे, अंबादास जाधव, जी.के. संस्थेचे सचिव न्यानेश्वर पवार, कार्याध्यक्ष महेश उंबर्गीकर, खजिनदार सुरज लांबतुरे, तसेच समाजसेवक कुमार चव्हाण, संतोष बोराडे, आकाश गवळी, नामदेव भंडारे, रोहित कांबळे, प्रभाकर राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षांतील सामाजिक, शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याचा आढावा सादर करण्यात आला. समाजातील वंचित व मागासवर्गीय घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन संस्था कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमास विविध समाज बांधव, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

