प्रभाग २२‎ मध्ये‎ भाजपाचा‎ दमदार शक्तीप्रदर्शन: किसन जाधव‎ संपर्क‎ कार्यालयाचे‎ पालकमंत्री जयकुमार गोरे‎ यांच्या हस्ते शानदार‎ उद्घाटन

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक‎ २२‎ चे नगरसेवक किसन जाधव यांच्या‎ रेल्वे‎ लाईन‎ सोनामाता प्रशाला‎ समोरील‎ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे‎ यांच्या‎ हस्ते‎ मोठ्या‎ उत्साहात‎ संपन्न झाले.‎ यावेळी आमदार‎ देवेंद्र‎ कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली‎ कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय‎ यांच्या‎ पुण्यतिथीनिमित्त‎ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून‎ अभिवादन करण्यात‎ आले.

दरम्यान ईच्छा‎ भगवंताची परिवाराच्या‎ वतीनं ढोल ताशाच्या निनादात‎ फटाक्यांच्या‎ आतिषबाजी‎ करत‎ पालकमंत्री जयकुमार गोरे‎ यांना भला मोठा हार घालून‎ त्यांचे‎ जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे‎ अवघा परिसर भाजपमय झाला‎ होता.‎ तर‎ जय श्रीराम जय‎ जय श्रीराम‎ चा नारा‎ घूमल्याने अवघा‎ परिसर‎ भगवामय‎ झाला‎ होता.

प्रभाग २२‎ च्या सर्वांगीण‎ विकासासाठी किसन‎ जाधव‎ व नागेश‎ आण्णा गायकवाड‎ यांनी कोट्यवधी रुपयांचा‎ निधी‎ आणून भरीव कामे‎ केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे‎ यांनी‎ काढले.‎ नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर‎ प्रभाग‎ २२ मधील‎ चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने‎ विजयी झाल्याने भाजपची ताकद‎ अधिक बळकट‎ झाल्याचे‎ त्यांनी‎ सांगितले. पुढील काळातही विकासकामांसाठी संपूर्ण‎ सहकार्य‎ राहील, अशी‎ ग्वाही त्यांनी‎ दिली आमदार देवेंद्र‎ कोठे यांनी‎ किसन जाधव यांचे कार्य‎ लोकाभिमुख व‎ प्रभावी नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगत,‎ सोलापूर शहर‎ मध्य विधानसभेत‎ ‘इच्छा भगवंताची’‎ परिवाराने‎ बजावलेल्या किंगमेकर‎ भूमिकेचा‎ विशेष उल्लेख‎ केला.

लक्ष्मण‎ मामा जाधव यांच्या‎ मार्गदर्शनाखाली‎ सक्षम‎ नेतृत्व घडल्याचे त्यांनी नमूद‎ केले‎ यावेळी‎ नगरसेवक किसन भाऊ‎ जाधव,‎ माजी नगरसेवक‎ नागेश आण्णा गायकवाड, नगरसेविका‎ चैताली शिवराज‎ गायकवाड, दत्तात्रय मामा नडगिरी, प्रभाग क्रमांक‎ २३‎ चे‎ नगरसेवक‎ राजशेखर मल्लिकार्जुन पाटील,‎ प्रभाग क्रमांक १६ चे‎ नगरसेविका कल्पना‎ संतोष कदम, अंबादास‎ जाधव, अमोल‎ गायकवाड, विनोद भाऊजी गायकवाड, अँड. किरण गायकवाड,‎ चेतन‎ नागेश अण्णा गायकवाड,‎ उमेश जाधव, शरद‎ शिंदे,‎ निलेश कांबळे,संतोष गायकवाड,‎ अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, माऊली जरग, शहाजन‎ शेख, शिवा पाटणकर,‎ तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड,‎ प्रथमेश‎ पवार, माणिक‎ कांबळे,‎ फिरोज‎ पठाण, वसंत कांबळे, महादेव राठोड,‎ हूलगप्पा‎ शासम, अजिंक्य शिंदे, सचिन‎ राऊत, ऋषी‎ येवले, दिनेश आवटी, नागेश जाधव‎ आदी मान्यवर‎ उपस्थित‎ होते.

कार्यक्रमात किसन जाधव‎ यांनी‎ पालकमंत्री‎ गोरे व‎ आमदार कोठे‎ यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद‎ व‎ सहकार्य अपेक्षित असल्याचे‎ मनोगत‎ व्यक्त केले.‎ दरम्यान सोलापूर‎ महानगरपालिकेचे माजी‎ महापौर‎ श्रीकांचनाताई यन्नम‎ आणि‎ आमदार देवेंद्र‎ कोठे‎ यांच्या‎ धर्मपत्नी‎ सौ‎ मोनिका वहिनीसाहेब यांनी देखील‎ किसन‎ जाधव‎ यांच्या संपर्क कार्यालयाला‎ भेट देऊन‎ त्यांच्या पुढील‎ वाटचालीस शुभेच्छा‎ दिल्या.‎

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!