शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा तयारीला वेग, राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी होणार.. जिजाऊ आणि शिवबांच्या विचाराचा जागर होणार..

2 Min Read

सोलापूर – ( प्रतिनिधी )

१९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पार पडणाऱ्या शिवजन्मोत्सव पाळणा सोहळ्याच्या नियोजनासाठी मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी डाळिंब आड

मैदान येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आई तू जिजाऊ हो ही यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे. त्यामुळे पाळणा सोहळ्या राष्ट्रमता जिजाऊंच्या पारंपारिक वेशभूषित सहभागी होण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी केला.

बैठकीत जिजाऊ पाळणा सोहळ्याचे स्वरूप, कार्यक्रमाची रूपरेषा, शिस्तबद्ध आयोजन, वेळेचे नियोजन तसेच महिलांचा सहभाग याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित महिलांनी यंदाही राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हा सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पाडण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर घडवलेले संस्कार, त्याग, मातृत्व आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचे स्मरण व्हावे, या उद्देशाने हा पाळणा सोहळा साजरा केला जातो. या कार्यक्रमातून महिलांमध्ये सामाजिक भान, राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत चंद्रिका चव्हाण, शोभा मोरे, नलिनी जगताप, सुधा अळळीमोरे, प्राध्यापक ज्योती वाघमारे यानी मत व्यक्त केले.

बैठकीदरम्यान महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपापली जबाबदारी स्वीकारत स्वयंसेवी सहभाग नोंदवला. तसेच पाळणा सोहळ्याच्या वेळी शिस्त, पारंपरिक वातावरण आणि मर्यादांचे पालन करण्यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊ पाळणा सोहळा भावपूर्ण वातावरणात, पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या सोहळ्याच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याचा व विचारांचा जागर करण्याचा संकल्प महिलांनी केला आहे. यावेळी पाळणा गीताचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

बैठकीचे प्रस्ताविक कार्याध्यक्ष उत्तरा बरडे यांनी तर प्रास्ताविक चारुशीला जगदाळे यांनी केले.

या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, श्रीकांत घाडगे, राजकुमार काकडे, श्रीकांत डांगे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांच्यासह संजीवनी मुळे,माजी उपमहापौर सुषमा घाडगे, नीलिमा शितोळे रेखा सलगर, प्रतिभा काळे, तेजा घाडगे, उज्वला साळुंखे, रेश्मा घुले, अर्चना बरडे, सुनंदा साळुंखे,

उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास घुले सचिन स्वामी यांनी परिश्रम घेतले.

नूतन नगरसेविकांचा सत्कार

 उपमहापौरपदी निवड झालेल्या ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, श्रद्धा पवार, मनोरमा सपाटे, मंदाकिनी तोडकरी, अलका भवर, मृण्मयी गवळी, यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या वैष्णवी गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!