सोलापूर : प्रतिनिधी
अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन सोलापूरमध्ये ‘जन्नतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून या बांधकामासाठी तब्बल रु. ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्र. २२ चे कार्यसम्राट नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. भूमिपूजनाचा समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आणि अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक नजीबभाई मुल्ला यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे.
या प्रसंगी शहर काझी अमजद सय्यद साहेब, मौलाना इब्राहिम कासमी, शहा इकबाल हुसेन दुर्वेश, मौलाना ताहेर बेग, हाजी मकबुल मोहोळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या सांस्कृतिक भवनामुळे अल्पसंख्यांक समाजातील विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नवे व्यासपीठ मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. स्थानिक पातळीवर समाजाच्या विकासासाठी हा उपक्रम आदर्श ठरेल असे मत स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता वळसंगकर हॉस्पिटलसमोर, जन्नतुल फिरदोस मुस्लिम कब्रस्तान येथे होणार आहे. समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन नगरसेवक किसन जाधव यांनी केले आहे.
