सोलापूर : प्रतिनिधी
GK बहुउद्देशीय सामाजिक संस्था व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना (महाराष्ट्र राज्य) लायन्स मथुराबाई फतेहचंद दमाणी हॉस्पिटल, लायन्स ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय (धर्मार्थ दवाखाना) व जिल्हा अंधत्व निवारण समिती दमाणी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु कृत्रिम नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
वेळ : शनिवार दि. 06/12/2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत स्थळ – 27/5 निराळे वस्ती, अरविंद धाम पोलीस वसाहत रोड, मुरारजी पेठ, सोलापूर येथे होणार आहे.

या कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट सचिव ला. असद सैफन, प्रमुख उपस्थिती डॉ. शिवाजी पाटील (R.M.D.), सुधीर थोबडे (मालक), महादेव राऊत (पोलीस निरीक्षक फौजदार चावडी, सोलापूर.), क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटोळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख शिवसेना पुरषोत्तम बरडे, माय सोलापूर संस्था संस्थापक अध्यक्ष महेश गाडेकर, क्रांती तालीम अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, माजी नगरसेवक हरिदास गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे.

या शिबीरात सर्व गरजू लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबीर आहे. तरी या शिबीरात डोळ्यांच्या प्राथमिक तपासणी नंतर मोतीबिंदूचे निदान झाल्यानंतर नेत्ररोग तज्ञ यांच्या कडून अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या शिबीराचा गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन GK बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष गोविंद कांबळे यांनी केले आहे.
