सोलापूर : प्रतिनिधी
माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह गाठी भेटींचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. थोरला मंगळवेढा तालीम, सोलापूरतर्फे आयोजित हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याविषयी असलेली आपुलकी, जनविश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांना भेटण्याची व शुभेच्छा देण्याची ही संधी असून, शहरातील विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमात शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा गौरव करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
