प्रतिनिधी । सोलापूर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग बालराज्य नाट्य स्पर्धेत सोलापूरच्या राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेने बालनाट्य स्पर्धेत संपूर्ण राज्यातून सांघिक तृतीय क्रमांकासह दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक आणि नेपथ्याचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविला होता. त्या पारितोषिकांचे वितरण राज्याचे सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले.

मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी अश्विनी तडवळकर यांना झाले मोकळ्या आभाळा या बालनाट्यकरिता दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले तर समर्थ आगाशे कलावंताला नेपथ्याचे सर्वोत्कृष्ट तिथे क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले तर सांघिक पारितोषिक प्रदान करताना सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे राज्याचे सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभीषण चवरे, नाट्य लेखक डॉ. दीपक रसाळ बालनाट्याच्या सूत्रधार अन्नपूर्णा साखरे हे उपस्थित होते.

याप्रसंगी आशिष शेलार यांनी संघाचे वैयक्तिक अभिनंदन करत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वाफ देत आहात याचे अभिनंदन करत काम करत राहा आपण नक्कीच प्रोत्साहन देऊ असे आश्वासन दिले.

संस्थेचे प्रमुख माजी आमदार प्रकाश यलगुलवर, मुख्याध्यापक शशीभूषण यलगुलवार, सौरभ शिंगाडे, आणि सूत्रधार अन्नपूर्णा साखरे यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करत विद्यार्थ्यांचे आणि कलावंतांचे अभिनंदन केले.
