स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, नाव नोंदणीची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस – लग्नाचे वस्त्र, शालू, मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास – विवाहाकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल. त्याच बरोबर हार-बाशिंग-तुरे, संसारोपयोगी भांडी, कपाट, अंतरपाट देण्यात येईल. वधू-वर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी १०० पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाद्य मिरवणूक/वरात आयोजकांकडून काढली जाईल.

बुधवार २६ नोव्हेंबर २०२५

संध्याकाळी ५ वा ४२ मिनिट गोरज मुहूर्तावर

विवाहस्थळ: कै.लिंगराज वल्याळ क्रीडांगण,कर्णिक नगर सोलापूर.

 

तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकी जवळ मुरारजी पेठ येथे संपर्क साधावे.

संपर्क क्रमांक 8055122233/9822611677

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!