सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय लिंगायत संघ, भारत यांच्या वतीने रविवार दि. २३/११/२०२५ रोजी संकाळी ११ ते १ नोंदणी व १ ते ४ या वेळेत डॉ. निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा (लिंगायत जोडो-पोटजात तोडो) वुध-वर पालक परिचय मेळावा करणार आहोत तरी या मेळाव्यामध्ये उच्चशिक्षीत, शेतकरी, अंध, अपंग, विधूर अशा सर्वच प्रकारच्या वधुवरांचा समावेश असणार आहे तरी या मेळाव्या मध्ये वुध-वर यांना मोफत प्रवेश दिला जाणार असुन यांची नोंदणी बसवा मॅट्रोमनी या वेबसाईटवर केली जाणार असुन वधु-वरांनी जास्त सहभाग घ्यावा यासाठी त्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक अध्यक्ष प्रदिप वाले यांनी दिली .
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे आहेत. प्रमुख पाहुणे जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश वाले, ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ, धाराशिव चे राजाभाऊ मुंडे, तुळजापूर लिंगायत अध्यक्ष गुरुनाथ बडूरे, अक्कलकोट लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजशेखर कापसे, अकलूजचे उत्कर्ष शेटे, मंगळवेढ्याचे अमोल म्हमाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तसेच या मेळाव्याकरीता सोलापूर जिल्ह्यातील सामजीक, राजकीय, धार्मिक, व शैक्षणीक विभागात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रीत करणेत येणार आहे यामध्ये लिंगायत समाज बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रदीप बापू वाले केले. या पत्रकार परिषदेस विजयकुमार हत्तुरे, सुरेश वाले, बाळासाहेब लठ्ठे, गौरीशंकर नरोणे, मनोज पुरवंत, विश्वनाथ कल्याण शेट्टी आधी उपस्थित होते.
