सोलापूर : प्रतिनिधी
सौदी अरेबियात उमराह यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीय ज़ायरीनच्या निधनाची बातमीने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना असल्याचे सर्वच स्तरांतून सांगितले जात आहे.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व ज़ायरीनसाठी प्रार्थना करताना AIMIM चे ज्येष्ठ नेते हाजी फारूक शाब्दी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.
त्यांनी म्हणाले, “ही घटना आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मनःपूर्वक सहभागी आहोत. अल्लाह सर्व मरहूमीन यांना जन्नतुल फिरदौस मध्ये उच्च मकाम अता करो आणि त्यांच्या कुटुंबियांना सब्र-ए-जमील प्रदान करो. आमीन.”

दरम्यान, AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी या संपूर्ण प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. ते इंडियन एम्बसीशी नियमित संपर्कात राहून मदतकार्य आणि पुढील प्रक्रिया जलद व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
मृत ज़ायरीनचे पार्थिव भारतात शक्य तितक्या लवकर आणण्यासाठी आवश्यक अधिकृत प्रक्रिया गतीने पार पाडाव्यात, यासाठीही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे.

या दुर्घटनेमुळे देशभरातून सहानुभूती आणि श्रद्धांजलीचा वर्षाव होत असून, यात्रेकरूंच्या सुरक्षितते बाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
