सोलापूर : प्रतिनिधी
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रलंबित असलेल्या खटल्यात दोष मुक्त करण्यात यावे म्हणून केलेल्या अर्जात कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमार दिघे यांनी खटला चालवू नये अशी तात्पुरती स्थगिती दिली.

या हकीकत अशी की दिनांक 20 1 2015 रोजी रात्री नऊ वाजाचे सुमारास मौजे तारापूर तालुका मोहोळ येथे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार टिपर व जेसीबी पकडलेला होता.

त्यावर कार्यवाहीसाठी परिमंडळ अधिकारी मोहम्मद हुसेन तांबोळी यांच्यासह काही कर्मचारी हे रात्री साडेनऊ वाजता गेले असता आमदार रमेश कदम यांनी तहसीलदार साहेब का आले नाहीत म्हणून त्यांना शिवीगाळ केली व पंचनामा माझ्या समक्ष करा त्यावर मी सही करणार आहे असे म्हणून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला अशा आशयाची फिर्याद महंमद हनीफ तांबोळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती .त्यावरून पोलिसांनी दोषारोपञक दाखल केले होते.

खटला हा पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असताना रमेश कदम यांनी दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर रमेश कदम यांनी ॲड रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात दोष मुक्तीसाठी पुनरवृत्ती अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲड रितेश थोबडे यांनी केलेल्या युक्तिवाद गृह धरून पुढील तारखेपर्यंत सत्र न्यायालयाने खटला पुढे न चालवण्याचा आदेश पारित केला.

यात माजी आमदार रमेश कदम यांच्यातर्फे ॲड. रितेश थोबडे, ॲड विनोद सूर्यवंशी तर सरकार तर्फे ॲड. पी एस राणे यांनी काम पाहिले.
