सोलापूर : प्रतिनिधी
कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामास आता गती येणार असून, पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने केलेल्या मागणीस सकारात्मता दाखवत 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, या कामास आज प्रशासकीय मान्यता मिळाली.

*दिलेला शब्द पाळणारा नेता आमदार देवेंद्र कोठे*
महात्मा बसवेश्वर जयंती दिवशी, आमदार देवेंद्र कोठे यांनी बसवेश्वर महाराज पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी आले असता, बसव भक्तांना आश्वासन दिले होते की, महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर कामासाठी भविष्य काळात निधी लागणार असेल तर, मी देईन याप्रसंगी बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे यांना प्रलंबित कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती.
भाजपा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी आमदार देवेंद्र कोठे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यातून पुतळा परिसर सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे व चबुतरा तसेच इतर सुशोभीकरण कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या विनंतीस आमदार देवेंद्र कोठे यांनी सकारात्मता दाखवत 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला या कामास आज प्रशासकीय मान्यता मिळाली.
