शहर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी.. मोटार सायकल चोरीचे 06 गुन्हे व मोबाईल चोरीचा 01 गुन्हा असे एकूण 07 गुन्हे उघडकीस

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

पोलिस वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे ग्रेड पो.उप.नि. शामकांत जाधव व पथकातील पोलीस अंमलदार पोह/1379 बापू साठे, पोशि/1725 सुभाष मुंढे, पोशि/1712 सैपन सय्यद, पोशि/1602 वसिम शेख असे मिळुन रात्रगस्त दरम्यान सोलापूर शहरामधील रेकॉर्डवरील आरोर्णीना चेक करत असताना, दि. 20/11/2025 रोजी गोपनिय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम त्याच्या ताब्यामध्ये एक शाईन मोटार सायकल घेवुन संशयितरित्या कुमठा नाका येथील क्रिडा संकुलच्या मागे असणाऱ्या लेप्रसि कॉलनी सोलापूर येथे थांबला आहे. सदर बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे बातमीचे ठिकाणी जावुन इसम नामे-करणकुमार हरी राठोड वय 38 वर्षे रा. प्लॉट नं. 12 गणेश नगर, नवीन आर.टी.ओ. ऑफीसजवळ, विजापूर रोड, सोलापूर यास ताब्यात घेतले.

त्यावेळी त्याच्या ताब्यातील शाईन मोटार सायकल क्र. MH-13-EG-6737 या मोटार सायकल बाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने, “स्टुम फायनान्समध्ये टु व्हिलर रिकवरी एजंट म्हणुन काम करत होतो. सध्या मी सदरचे काम सोडले आहे. पुर्वी, मी स्टुम फायनान्समध्ये काम करत असताना सोलापूर येथील अॅक्सेस बँकेमध्ये लोन असलेल्या व सदरचे लोन न-भरलेल्या 06 मोटार सायकल सोलापूर शहरातील विविध ठिकाणावरुन उचलुन घेवुन त्या मोटार सायकल अॅक्सेस बँकेच्या डम्प यार्डला न-लावता माझ्याकडेच ठेवुन घेतल्या आहेत.” असे सांगितले. त्यावरुन सदर इसमाकडून नमूद 06 मोटार सायकली जप्त केल्या आहेत. मिळालेल्या मोटार सायकल बाबत सोलापूर शहरातील मोटार सायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता सदरच्या मोटार सायकली चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले.

तसेच नमुद आरोपीकडून मिळून आलेल्या मोटार सायकल या नमुद गुन्हयातील चोरीच्या मोटार सायकल असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे करणकुमार हरी राठोड यास दि. 20/11/2025 रोजी ताब्यात घेवुन त्याच्याकडून 06 मोटार सायकल जप्त करुन एकूण 4,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 06 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तसेच इसम नामे मूजाहीद हमीद मनियार वय 19 वर्षे रा. घर नं. 444/3 खडी मिशनजवळ, नवीन गोदुताई घरकुल, कुंभारी ता.दक्षिण सोलापूर, सध्या रा. ताज मेडीकलच्या पाठीमागे, अशोक चौक, सोलापूर यास दि. 16/11/2025 रोजी ताब्यात घेवुन त्याने चोरलेला 10,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी A14 5G मॉडेलचा मोबाईल फोन जप्त करुन सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 919/2025 भा.न्या.सं. कलम 303 (2) अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटार सायकल चोरीचे 06 गुन्हे व मोबाईल चोरीचा 01 गुन्हा असे एकूण 07 गुन्हयातील एकूण 4.30,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन उत्तमप्रकारे कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, ग्रेड पो.उप.नि. शामकांत जाधव व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, राजेश मोरे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!