रामवाडीत विधानसभेचे उपाध्यक्ष‎ तथा सह‎ संपर्कप्रमुख‎ अण्णा बनसोडे‎ यांच्या‎ शुभहस्ते‎ १‎ कोटींच्या सांस्कृतिक‎ भवन‎ प्रकल्पाचा‎ शुभारंभ

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

रामवाडी‎ परिसरासाठी‎ विकासाचा‎ नवा‎ अध्याय सुरू झाला असून उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार‎ यांच्या‎ विशेष‎ निधीतून तब्बल‎ १‎ कोटी रुपयांच्या दोन‎ महत्त्वाकांक्षी‎ सांस्कृतिक‎ प्रकल्पांची‎ उभारणी‎ होत आहे.‎ विश्वरत्न‎ डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन‎ व‎ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‎ सांस्कृतिक‎ भवन‎ या‎ दोन भव्य‎ योजनांचा‎ शुभारंभ व‎ भूमिपूजन सोहळा‎ शुक्रवार, 28‎ नोव्हेंबर‎ 2025‎ रोजी सायंकाळी‎ 6.00 वा. पार‎ पडणार‎ आहे.‎ दरम्यान डॉ.‎ बाबासाहेब‎ आंबेडकर‎ सांस्कृतिक‎ भवनासाठी ₹50‎ लाख, तर लोकशाहीर अण्णाभाऊ‎ साठे सांस्कृतिक‎ भवनासाठी‎ ₹50‎ लाख‎ अशी भक्कम‎ आर्थिक तरतूद करून रामवाडी‎ परिसराला कायमस्वरूपी‎ सांस्कृतिक दिशा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.‎

या महत्त्वपूर्ण‎ विकासकामांचा‎ शुभारंभ विधानसभा‎ उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे‎ यांच्या‎ शुभहस्ते होणार‎ असून‎ कार्यक्रमाचे‎ ठिकाण‎ रामवाडी,‎ अंबाबाई मंदिराच्या‎ पाठीमागे, प्रभाग क्र. 22‎ येथे‎ निश्चित‎ करण्यात आले‎ आहे.‎ स्थानिक‎ नागरिकांसाठी‎ हा ऐतिहासिक क्षण ठरणार असून या सोहळ्यास किसन‎ जाधव,‎ प्रदेश‎ उपाध्यक्ष,‎ राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टी‎ व नागेश गायकवाड,‎ कार्यसम्राट‎ नगरसेवक,‎ सोमपा, सोलापूर‎ यांनी मोठ्या‎ संख्येने‎ उपस्थित राहण्याचे‎ आवाहन‎ केले‎ आहे.‎

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!