सोलापूर : प्रतिनिधी
नवीपेठ येथील शिवतेज शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वजित शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाचे संस्थापक अजित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीपेठ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना अजित शिंदे यांनी सांगितले की, दि. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या कालावधीत वृक्षारोपण, प्रसाद वाटप, महिलांच्या हस्ते पूजन तसेच शिवचरित्रावर व्याख्यान असे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर विश्वजित शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुजित शिंदे, निलेश ताकभाते, राजू खुर्द, सुनील भोसले, मिथुन कामत, नितीन शिंदे, निलेश बलरामनवर, वासुदेव कुलकर्णी, अभिजित फताटे, रोहित शिंदे, आबा ताकभाते, लक्ष्मीकांत दरक, श्रीपाद येरमालकर, राजू ताकभाते, गणेश परदेशी, प्रशांत ताकभाते, सागर सोनकांबळे, आकाश ताटवे, नागेश शटगार, अशोक मेंगजी, संजय जावळकोटी, विकी भुमकर, सुरेंद्र चिल्लळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी वासुदेव कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार
मानले.
