सोलापूर : प्रतिनिधी
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती यांच्याकडून शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक जाहीर करण्यात आले. त्यात सोलापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे व पोलिस उपनिरीक्षक राजकुमार तोळनूरे यांना गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे सध्या एमआयडीसी पोलिस ठाणे येथे आहेत. त्यांनी आतापर्यंत पुणे, नागपूर, औरंगाबाद, सीआयडी येथे सेवा झाली. आतापर्यंत त्यांची ३६ वर्षे सेवा केली आहे. पुण्यात ४५ लाखाचा दरोडा, लहान मुलाने आजीचा खून, असे अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहेत.
पोलिस उपनिरीक्षक राजकुमार तोळनुरे हे पूर्वी विजापूर नाका पोलिस ठाण्यात डीबी पथकाला होते तेव्हा त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणण्यास मदत केली. आता ते वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.

यानिमित्त 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
