सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारप्रेरणेवर उभी असलेल्या छत्रपती ब्रिगेड या सामाजिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जुळे सोलापूर येथील म्हेत्रे टॉवर सभागृहात जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीची सुरुवात महिलांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

संघटनेचे संस्थापक श्याम कदम यांनी छत्रपती ब्रिगेडचा उद्देश मांडताना सांगितले की, “अठरापगड जातीधर्मातील युवकांना एकत्र आणून सोलापूरच्या विकासासाठी लढा देणे, सामाजिक प्रश्न सोडवणे आणि शिव–शाहू–फुले–आंबेडकर–बसवण्णा यांच्या विचारधारेवर संघटना पुढे नेणे हे आमचे ध्येय आहे.”

बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली.
जिल्हा पदाधिकारी —
जिल्हाध्यक्ष : अरविंद शेळके
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष : मोनाली धुमाळ
जिल्हा उपाध्यक्ष : आरती नारायणकर, रमेश चव्हाण, मल्लिकार्जुन भंडारे
जिल्हा कार्याध्यक्ष : गजानन शिंदे, नागेश पवार
जिल्हा संपर्कप्रमुख : इस्माईल मकानदार
जिल्हा संघटक : गौरीशंकर वरपे, अमोल सलगर
जिल्हा सचिव : बबन डिंगने, ज्ञानेश्वर पवार

शहर पदाधिकारी —
शहराध्यक्ष : सिताराम बाबर
महिला आघाडी शहराध्यक्ष : माधुरी चव्हाण
शहर उपाध्यक्ष : शुभांगी लचके, रमेश भंडारे, सुलेमान पिरजादे
शहर कार्याध्यक्ष : सिद्धाराम कोरे
शहर सचिव : तेजस गायकवाड, बसवराज आळंगे
शहर प्रसिद्धी प्रमुख : मल्लिकार्जुन शेवगार
शहर संघटक : संकेत कुलकर्णी

यावेळी संघटनेचे कार्यकर्ते सनी पाटू, स्वप्निल शिंदे, शाहिद सय्यद, महेश भंडारे, विश्वनाथ आमने, अमोल भोसले, ओंकार कदम, सिद्धाराम आवटे, अमजद मुल्ला, विकास बचुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्याने आगामी काळात छत्रपती ब्रिगेडची सामाजिक आणि संघटनात्मक कामे अधिक गतीमान होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
