एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार — १८ वर्षीय युवतीचा खून; आरोपीस आजीवन कारावास

5 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

यात फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. घटनेपुर्वी अंदाजे तीन महिन्यापूर्वी फिर्यादी यांची चुलत आत्या प्रतिभा व त्यांचा मुलगा ज्योतीबा (आरोपी)फिर्यादीचे घरी आले होते. मयत सुनिता ही फिर्यादी श्रुतीका यांची लहान बहीण आहे. मयत सुनिता व ज्योतीबा यांचे लग्नाची मागणी घातली होती त्या वेळी फिर्यादीचे आईने मयत मुलगी सुनिता अज्ञान आहे व शिक्षण घेत आहे असे म्हणून लग्नास नकार दिला. तेंव्हापासुन फिर्यादी व आरोपी यांचे कुटुंबातील जाणे-येणे कमी झाले होते.

मयत सुनिता व आरोपी ज्योतीबा यांचे मोबाईल द्वारे बोलणे व व्हॉटसअॅप संदेश देवाण घेवाण चालु होते. फिर्यादी यांचे वडीलांचे सन २००८ मध्ये निधन इ गाले आहे. मयत सुनिता ही घटनेच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती व ती लक्ष अकौंटन्सी क्लासेस कन्ना चौक येथे शिकवणीस दु. ०३.३० वाजता जात होती व संध्याकाळी ५-६ दरम्यान घरी येत होती असा तिचा नित्यक्रम होता.

साक्षीदार निकीता बिनगुंडी ही मयत सुनिताची मैत्रीण होती व ती देखील मयत सुनितासोबत शिकवणीस जात येत होती. घटनेच्या दिवशी दि.०८/०२/२०२१ रोजी मयत सुनिता घरातुन अकौंटन्सी क्लासकरीता लक्ष अकौंटन्सी क्लासेस कन्ना चौक दु. ०३.३० वाजता गेली होती. परंतु ती रात्री उशीरा पर्यंत घरी आली नाही. त्याबाबत चौकशी केली असता सुनिता हिची मैत्रीण निकीता हिने सांगितले की, संध्याकाळी ०५.०० वा. क्लास संपल्यावर ती व मयत सुनिता ह्या दोघी अक्कलकोट नाका येथे आलो होतो त्यावेळी आरोपी ज्योतीबा हा मोटारसायकल घेऊन आला होता व तीला मोटारसायकल वरुन घरी घेऊन गेला व सुनिताला मोबाईल केला असता ती फोन उचलत नव्हती. आरोपी ज्योतीबा ह्यास मोबाईल फोन केला असता त्याने सांगितले की, सुनिता बेशुध्द झाली आहे व तीस उपचारास मार्कंडेय रुग्णालय येथे आणले आहे.

फिर्यादी श्रुतीका व तिची आई साक्षीदार कांचन कुसेकर हे मार्कंडेय रुग्णालयात गेले असता आरोपी हा तेथे होता व उपचारास पैसे आणतो असे म्हणून निघून गेला तो परत आलाच नाही. मार्कंडेय रुग्णालयामध्ये सुनिता हिस मयत अवस्थेत आणल होते. मयत सुनिताला पाहिले असता तिच्या गळ्यावर, पायावरील हुनवटीवर जखमा झालेल्या होत्या. आरोपीने मयतास मार्कंडेय रुग्णालय येथे आणण्याची घटना सी.सी.टी.व्ही. कॅमरात टिपली गेली. आरोपी ज्योतीबा त्यानंतर फरार झाला.

मयताचे शवविच्छेदन अहवाल मध्ये सुनिता हिचा मृत्यु हा “गळा दाबुन इ गालेला मृत्य” असे मरण (मॅन्युअर स्ट्रॅग्युलेशन Manual Strangulation) असा अहवाल आल्याने मयत सुनिता हिचा खुन आरोपी ज्योतीबा ह्याने केल्याची फिर्याद दाखल केली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन त.अ. विश्वनाथ सिद यांनी केला व आरोपीस अटक केल्यानंतर त्यांनी प्रस्तुत गुन्ह्यासाठी (स्कीपिंग रोप) उड्या मारण्याची दोरीचा उपयोग केल्याने तो तपासकामी जप्त करण्यात आला. स्कीपींग रोपवर मयताचे केसाचा गुंता होता व आरोपीच्या जप्त कपड्यावर टी र्शटवर केस असल्याचा निष्कर्श रासायनिक तज्ञांच्या निष्कर्शास आला दोन्ही केसांची डी. एन.ओ. चाचणी मध्ये दोरीवरील केस व आरोपीच्या शरीरावरील केस एकाच व्यक्तीचे म्हणजे महीलेचे आहेत असे ज्ञात झाले.

सरकार पक्षातर्फे एकुण चोवीस साक्षीदार यांचे जबाब अॅड. आनंद कुर्डकर यांचे मार्फत नोंदवणेत आले. त्यात बिनगुंडी ही एकमेव साक्षीदार हिने आरोपी ज्योतीबा व सुनिता हीस एकत्र सुनिता जिवंतपणी पाहिल्याची साक्षीदार होती. तिचा जबाब महत्वाचा ठरला, वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल, रासायनीक तज्ञांचे व वैज्ञानिक तज्ञांचे अहवाल व परिस्थिती अन्य पुराव्यावर खटला अवलंबुन होता. मयत आरोपीचे व्हॉट्सअॅप चॉट संदेश व घटनेच्या दिवशीचे बोलणे तसेच त्यांच्या मध्ये झालेले मोबाईल फोन केल्याची फोनद्वारे मोबाईल कंपनीच्या नोडल अधिकारी यांचे जबाबातुन स्पष्ट झाली. आरोपीने सुनिता हीचा लग्नास नकार दिलेले कारणावरुन हाताने व दोरीने गळा आवळुन खुन केल्याचा खटला सरकारतर्फे सादर केला गेला. खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मनोज शर्मा समोर सुनावणी करण्यात आला.

प्रस्तुत समरी ओ मध्ये सरकार तर्फे पुराण्याच्या शाबीतांची जबाबदारी अभियोग पक्षाची असली तरी मयत व आरोपी यांना शेवटी मयत आरोपीसोबत जिवंत पाहिल्याचा पुरावा हा महत्वाचा दुवा असुन मयतास मृत्यु कशामुळे झाला याचे केवळ माहिती मे. न्यायालयास सादर करणे याचे उत्तरदायित्व कायद्याप्रमाणे आरोपीवर आहे. मे. न्यायालयाने आरोपीने मयताचे मृत्युबाबत कोणताही खुलासा न्यायालयासमोर केलेला नाही त्यामुळे अभियोग पक्षाने प्रारंभीचा विश्वासह्य पुरावा सादर केला आहे व इतर पोलीसांनी अन्य पुरावा देखील प्रत्यक्ष घटना पाहणारा साक्षीदार उपलब्ध जरी नसला तरी परिस्थिती जन्य पुराव्यावरुन आरोपी हा मयताचे खुनास जबाबदार आहे व ते अनुमानीत करता येते असे स्पष्ट करुन आरोपी ज्योतीबा गायकवाड यास मयत सुनिता हिचे खुनास जबाबदार धरुन दि.२९/११/२०२५ रोजी दोषी धरण्यात आले व आरोपीच्या शिक्षे संदर्भात सुनावणी तहकुब केली.

आजरोजी शिक्षेबाबत अभियोग पक्ष, मुळ फिर्यादी व बचाव पक्षाचा युक्तीवाद शिक्षेबाबत झाला. आरोपीस भा.द.वि. कलम ३०२ अन्वये अजिवन कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा फर्माविली व दंडाची रक्कम मयत सुनिता हिची आई कांचन कुसेकर यांना नुकसान भरपाई म्हणून शिक्षा फर्मावली, सरकारतर्फे अँड. आनंद कुर्दुकर, मुळ फिर्यादी तर्फे अँड. रविराज सरवदे, अँड. पुजा सरवदे, अँड. रोहिणी भंडारे, बचाव पक्षातर्फे अँड. इनामदार यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पो.कॉ. प्रविण जाधव कार्यरत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!