सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक मच्छिंद्र भीमराव कदम (वय ८८) यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कदम यांच्या मागे चार मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सोलापूरातील दिवाणी व फौजदारी वकील राम कदम तसेच पत्रकार हरिश्चंद्र कदम यांचे ते वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कर्देहळ्ळी येथील त्यांच्या शेतातील राहत्या घरापासून निघणार आहे. नातेवाईक, मान्यवर, वारकरी भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली.
