सोलापूर : प्रतिनिधी (विशाखापट्टणम)
अखिल भारतीय २८ व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकादमीच्या खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत तब्बल २५ पदकांवर आपला ठसा उमटवला. ओकिनावा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, आंध्र प्रदेश यांच्या वतीने झालेल्या या भव्य स्पर्धेत शिवलीला अकादमीने विविध गटांमध्ये प्रभावी प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अकादमीतील खेळाडूंनी मिळवलेली पदके पुढीलप्रमाणे :
🥇 सुवर्ण पदक विजेते, सुदर्शन वाणीपरीट, शौर्य जगताप, धनराज नवले
🥈 रौप्य पदक विजेते, समृद्धी वाणीपरीट, प्रसाद सलगर, प्रथमेश कदम, समर्थ माने, कबीर भोसले, शौर्य जगताप
🥉 कांस्य पदक विजेते, युग भोसले, स्वराज भोसले, समृद्धी वाणीपरीट, यशराज नवले, जयराज नवले, वैदही नवले, नम्रता कौडकी, जयश्री कौडकी

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सेनसाई शिवशरण वाणीपरीट व स्मिता वाणीपरीट यांचे सक्षम मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कष्टसाध्य प्रशिक्षणातून खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर अशी भक्कम कामगिरी साध्य केली.
विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीचे आमदार विजय देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर पद्माकर काळे आदी मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकादमीच्या या भव्य यशामुळे सोलापूर जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, आगामी स्पर्धांबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
