सोलापूर : प्रतिनिधी
आहेरवाडी ते फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर रस्त्यावर सिंदगी वस्ती जवळ दरोडा टाकल्या प्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील आळगी गावातील आठ आरोपीची में न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

दि 07/05/2016 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो मध्ये पाण्याच्या बाटल्या भरून मौजे आळगी ता. अक्कलकोट येथे उतरविण्यासाठी सोलापूर, होटगी, आहेरवाडी, फताटेवाडी, मार्गे आळगी कडे जात असताना आहेरवाडी शिवारातील आहेरवाडी ते फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर दरम्यान असलेल्या सिंदगी वस्ती जवळ रोडवर दोन मोटारसायकल वर एकूण चार चोरटे तोंडाला रुमाल बांधून तु आम्हाला कट का मारला गाडी बाजूला घेण्यास सांगून शिवीगाळ, दमदाटी, व भीती दाखवून आईशर मध्ये बसलेल्या लोकांच्या पॅन्ट व शर्ट च्या खिशातून एकूण 37500/- इतकी रक्कम काडून घेण्यात आले अशा आशयची फिर्याद नामे दत्तात्रय संतनाथ मलमे यांनी वळसंग पोलीस स्टेशन यथे नोंद केली.

त्यानंतर पोलीसांनी आरोपी नामे हजरत महताब शेख, हुशैन मोहम्मद अली कुमठे, जहांगीर याशिन कुमठे, हुशेन बाशा इस्माईल कुमठे, लियाकत जैनुद्दीन कुमठे, राजकुमार प्रकाश सुतार, व अन्य दोन यांच्या विरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आला.
सदर खटला हा सोलापूर येथील में जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे चाल विण्यात आला. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. यात आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी वरील सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपी तर्फे अॅड विक्रांत वि फताटे, अॅड तारासिंग राठोड, अॅड विशाल भरमशेट्टी, अॅड राजीव चव्हाण,अॅड प्रकाश फताटे, अॅड प्रसाद बिराजदार, अॅड साईनाथ मेकाले यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड शांतिकुमार दुलंगे यांनी काम पाहिले.
