सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरकरांसाठी सुख्या आणि ओल्या माव्यांचे भव्य व दर्जेदार दालन आता खुले झाले असून सात रस्ता परिसरात, चंदूकाका सराफ यांच्यासमोर व सुधा इडली ग्रहच्या शेजारी ‘ड्राय फ्रुट हाउस’ या नावाने हे नवीन दालन सेवेत दाखल झाले आहे.

या दालनामध्ये देश-विदेशातून आयात केलेले तब्बल अडीचशेहून अधिक प्रकारचे उच्च दर्जाचे ड्रायफ्रूट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दर्जा, चव आणि ताजेपणा यावर विशेष भर देण्यात आला असून एकाच ठिकाणी विविध पर्याय उपलब्ध झाल्याने सोलापूरकरांना मोठा लाभ होणार आहे.

ड्रायफ्रूट्ससोबतच विविध देशांतील प्रसिद्ध व आकर्षक चॉकलेट्सची मोठी रेंज देखील येथे उपलब्ध आहे. त्यामुळे ड्रायफ्रूटप्रेमींंसह चॉकलेटप्रेमी ग्राहकांनाही या दालनाचा खास लाभ होणार आहे. यश डेव्हलपर्सचे डायरेक्टर सुयश खानापुरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे दालन हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष उपयुक्त ठरणार आहे.

थंडीच्या दिवसांत आरोग्यदायी व पौष्टिक आहारासाठी दर्जेदार ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा, असे आवाहन सुयश खानापुरे, आप्पासाहेब हणमशेट्टी, मयूर दरगड व संदीप शिंदे यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी खालील सय्यद, बापूसाहेब पाटील, नर्सिंग बायस, महेश हिरेमठ आणि मल्लिनाथ घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ड्राय फ्रुट हाउस’मुळे सोलापूर शहरात दर्जेदार ड्रायफ्रूट्स व चॉकलेट्ससाठी एक नवा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे.

