सोलापूर : प्रतिनिधी
वर्ल्ड ऑफ वूमेन (WoW) या महिला संस्थेच्या वतीने श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेमध्ये महिलांमार्फत चालविण्यात येणाऱ्या फूड स्टॉलचे उद्घाटन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या स्वयंपूर्णतेला चालना देणारा हा उपक्रम संस्थेच्या अध्यक्ष विद्या लोलगे यांच्या प्रेरणेतून साकार झाला आहे.

या फूड स्टॉलमध्ये भाविकांसाठी स्वच्छ, ताजे, खमंग व रुचकर खाद्यपदार्थ अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गड्डा यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी गाळा क्रमांक ११ ला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या फूड स्टॉलच्या यशस्वी आयोजनासाठी मार्था आसादे, प्रिया कुलकर्णी, सावित्री शिवशरण, गीता मुळे, रेश्मा शेख, कृतिका हुंगुण्ड, साधना भापकर, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, शोभा गायकवाड, कांचन चौगुले, सारिका लामकाने, स्वाती मुकणार, शबाना शेख, सायरा शेख, लता ढेरे, शारदा मसुदी, उमा चिपन्हाट्टी व ऋतुजा काटकर या महिलांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

महिलांच्या कौशल्याला व कष्टाला व्यासपीठ देणारा हा उपक्रम गड्डा यात्रेतील भाविकांमध्ये विशेष आकर्षण ठरत असून, महिला सक्षमीकरणाचा आदर्श नमुना म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
