पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गिरी माळी, सचिवपदी सुमित जानगवळी

2 Min Read

सोलापूर | प्रतिनिधी

येथील पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने येणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्रा येथील ७ नंबर शाळेत एक महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी गिरी माळी तर सचिवपदी सुमित जानगवळी यांची एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीस आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल उपस्थितांनी तीव्र शोक व्यक्त करत दोन मिनिटांचे मौन पाळले.

ही बैठक माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी त्यांनी शिवजन्मोत्सव शिस्तबद्ध, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

बैठकीस जयंत शेळके, सचिन शिंदे, आनंद कोलारकर, बाबू बनसोडे, निशांत सावळे, लोकेश इरकशेट्टी, आदित्य घाडगे, विजय कांबळे, सचिन स्वामी, देविदास घुले, वैभव गंगणे यांच्यासह पत्रा तालीम मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवजन्मोत्सवात पारंपरिक वाद्ये, लेझीम तसेच ढोल-ताशांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तरुणांचा सक्रिय सहभाग वाढवून उत्सव अधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला.

नूतन उत्सव समिती पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष : गिरी माळी

उपाध्यक्ष : प्रज्वल काळे, चैतन्य भगत

खजिनदार : तुषार गायकवाड

कार्याध्यक्ष : ओंकार कदम

मिरवणूक प्रमुख : अजिंक्य शिंदे, सुहास चाबूकस्वार, सुरज पाटील

लेझीम प्रमुख : महेश जगदाळे, अनिकेत बनसोडे

प्रसिद्धी प्रमुख : ओम कदम, जन्मजय भोसले

सचिव : सुमित जानगवळी

निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अखेरीस “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!