राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ओमकार गायकवाड यांची चमकदार कामगिरी; दोन रौप्य पदकांची कमाई

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

युनायटेड नॅशनल गेम्स 2026 अंतर्गत नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील लिपिक पदावर कार्यरत असलेले ओमकार हरिदास गायकवाड यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 30 ते 35 वयोगटात झालेल्या 100 मीटर व 50 मीटर बॅकस्ट्रोक या दोन्ही प्रकारांत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावत दोन रौप्य पदकांची कमाई केली.

देशभरातून नामवंत जलतरणपटू सहभागी झालेल्या या स्पर्धेत श्री. गायकवाड यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपअधीक्षक शिरीष हुंबे तसेच कार्यालय अधीक्षक बाबासाहेब धर्मे यांनी श्री. गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कर्तव्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करणारे ओमकार गायकवाड हे पोलीस दलातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!