मोहोळमध्ये गोरक्षकावर कसाईचा हल्ला; पोलिसांच्या निष्क्रियतेवर निवेदन

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यात गोरक्षकावर कसाईने धक्काबुक्की व दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे SP अतुल कुलकर्णी आणि DYSP प्रीतम यावालकर यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काही काळापूर्वी गोरक्षकांना माहिती मिळाली की मोहोळ परिसरात काही गाई व बैल कत्तलीसाठी आणून बांधले गेले आहेत. याबाबत पोलिसांच्या मदतीने गोरक्षक त्या ठिकाणी पोहोचले असता कसाईने त्यांच्यावर दगड व काठीने हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी गोरक्षकांची गाडी सुद्धा फोडण्यात आली.

घटना पोलिसांच्या डोळ्यांसमोर घडत असताना पोलिसांनी बघाची भूमिका घेतली, तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी खोटा अहवाल दिल्याची तक्रार करण्यात आली. यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच कसाई विरुद्ध “सरकारी कामात अडथळा” ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देताना अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, गोसेवक अमित राऊत, शहर संघटक प्रसाद झेडंगे, तसेच गोरक्षक लतेश हिरवे, रुपेश बेलेराव, प्रमोद कारंडे उपस्थित होते.

अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे पदाधिकारी यांनी स्पष्ट केले की, गायी व बैलांचे रक्षण ही संघटनेची प्राथमिक जबाबदारी असून, सरकारी अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!