हरित सोलापूरसाठी 2026 या वर्षात एक लाख वृक्षांची लागवड बरोबर संवर्धन होणार : उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या हरित संकल्पनेतून आज वृक्षारोपण करून कार्याची उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शहरातील वाढते प्रदूषण, तापमानवाढ व पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता सोलापूर शहर अधिक हरित, स्वच्छ व आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक जीवन चाबुकस्वार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, उद्यान अधीक्षक स्वप्निल सोलंनकर तसेच पर्यावरण दुत म्हणून ओळखले जाणारे डॉ.मनोज देवकर हरित संकल्पना उपक्रमाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, वृक्षारोपण हे केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न ठेवता वृक्षसंवर्धन व संगोपनावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात सोलापूर शहर अधिक हरित करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात येईल. व सोलापूरचे माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांचे निधन झाले असून यांच्याही स्मृती पर एक झाड लावण्यात आले. तसेच महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांनी वृक्षारोपणा सोबतच वृक्षांचे संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले.

या हरित संकल्पनेअंतर्गत येत्या काळात शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती मोहिमा, शाळा महाविद्यालयांत सहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर उपक्रमामुळे सोलापूर शहराच्या पर्यावरण संतुलनास चालना मिळणार असून स्वच्छ व सुंदर सोलापूर घडविण्यास निश्चितच मदत होणार आहे. 2026 या वर्षात एक लाख वृक्षांची लागवड बरोबर संवर्धन होणार आहे असे उपमहापौर यांनी संबोधले आहे व हरित सोलापूर साठी सर्व नगरसेवक व लोकसहभाग समवेत असणार आहेत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!