डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात प्रवाशांना लाडू वाटप, भीमशक्ती व सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेचा उपक्रम

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सोलापुरातील मध्यवर्ती एसटी स्टँड येथे प्रवाशांना लाडू वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. भीमशक्ती सामाजिक संघटना व सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेतर्फे आयोजित या उपक्रमातून प्रवाशांना गोड प्रसाद देत सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजना चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोठे, पोलीस सहायक आयुक्त पोमण सर, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव राऊत, सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, एसटी आगार प्रमुख अशोक बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेचे शहराध्यक्ष, भीम शक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विनोद वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेचे शहराध्यक्ष तसेच भीम शक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांचे सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक व कला क्रीडा क्षेत्रात केलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असून, येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भावना भाजपाच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केली.

यावेळी निखिल पवार, गणेश वाघमारे, तात्या रणदिवे, अभिषेक पाटोळे, रोहित जाधव, साहिल जाधव, विकी लोंढे, पृथ्वीराज लोंढे, अभिजित डोलारे, सौदागर मोरे, दयानंद गवळी, अभिजित रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमामुळे एसटी प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यास अशा सामाजिक उपक्रमांचा हातभार लागतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!