कुंभारीतील गेनसिद्ध महाराज मंदिराला ९ लाखांचा जनरेटर अर्पण, अखंड वीजपुरवठ्याची सोय

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी गावातील पवित्र गेनसिद्ध महाराज मंदिराला शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने ५८.५ KVA क्षमतेचा (सुमारे ९ लाख रुपये किंमतीचा) किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर अर्पण करण्यात आला. या उपक्रमामुळे मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा तसेच भक्तांच्या सेवेसाठी अखंड वीजपुरवठ्याची महत्त्वाची सोय उपलब्ध झाली आहे.

या उपक्रमामुळे मंदिराची दीर्घकालीन गरज पूर्ण होणार असून, गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कुंभारी ग्रामस्थांनी या योगदाना बद्दल आनंद व्यक्त करत फाउंडेशनचे आभार मानले.

कार्यक्रमाची सुरुवात मंदिरात पूजाअर्चा करून करण्यात आली. श्री गेनसिद्ध महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर छोटेखानी समारंभ पार पडला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शिखर पहारिया आणि त्यांच्या फाउंडेशनच्या सदस्यांचे सामाजिक बांधिलकी व सेवाभावी कार्याबद्दल गावकऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. श्रद्धा आणि कृती यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!