सोलापूर : प्रतिनिधी
भाजप नेते तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेळाव्यासाठी भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी भाजप नेते दिलीप कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक वेशभूषेत, तुतारी, संबळ आणि ढोल-ताशांच्या गजरात मार्गस्थ झाले होते.
या रॅलीने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी करत या जल्लोषपूर्ण सोहळ्याचा आनंद घेतला. पारंपारिक वाद्यांच्या निनादात आणि गोंधळींच्या सादरी करणामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्सवी बनले होते.
दरम्यान, सोलापूर शहरातील आमदार देवेंद्र कोठे यांनी मिल कामगारांच्या चाळीचा प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सह महसूल विभागाकडे लेखी निवेदन तसेच तोंडी पाठपुरावा केल्यानंतर या प्रश्नाला अखेर यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यात चाळीचा प्रश्न मार्गी लागल्याची घोषणा करत कामगारांना दिलासा दिला.
या रॅलीत मंगेश डोंगरे, राहुल काटे, संजय शिरसागर, राजकुमार पाटील, उत्तम गवळी, बाळू सुरवशे, सतीश मस्के, आरिफ शेख, युवराज घाडगे, रमेश घोडके, रोहन उडाणशिवे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह प्रभाग क्रमांक 6 आणि 15 मधील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
