सोलापूर : प्रतिनिधी

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पालखी सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले होते.

कार्यक्रमाला खासदार ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेते अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानकर, ट्रस्टी अध्यक्ष प्रसाद झुंजे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, नगरसेवक अनंत जाधव, संजय कोळी, शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, प्रवीण दर्गोपाटील आदींनीही उपस्थिती दर्शवली.


या पालखी सोहळ्याद्वारे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार करत सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देण्यात आला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

