Dr. Babasaheb Ambedkar Jayanti निमित्त सोनाई फाउंडेशनचा भव्य उपक्रम; 25 क्विंटल पुलाव, 1 लाख लिटर शरबत वाटप

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

Sonai Foundation यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त भव्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत तब्बल 25 क्विंटल पुलाव आणि 1 लाख लिटर शरबताचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श घालून देण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन संस्थापक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. किस्मत चौक मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने रेल्वे लाईन परिसरात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, विविध घटकांतील लोकांनी एकत्र येत जयंती उत्सव साजरा केला. या माध्यमातून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला.

सोनाई फाउंडेशनच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून, अशा सामाजिक कार्यांमुळे डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रचिती प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!