सोलापूर : प्रतिनिधी
अक्षय तृतीया निमित्त मानाचा श्री आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आंबा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात विविध प्रकारच्या आंब्यांचे आकर्षक प्रदर्शन व वितरण करण्यात आले, ज्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी मनोभावे श्रींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या.

महोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विविध प्रकारचे आंबे पाहण्यासाठी तसेच प्रसाद वितरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या कार्यक्रमाला ट्रस्टचे उपाध्यक्ष शिवानंद मेडके, नगरसेवक संजय कोळी, संजय कणके, तसेच कार्यकारिणी सदस्य राहुल कुमणे, सुरेश हचडे, किरण अक्कलकोटे, प्रफुल्ल झाडबुके, विशाल फुलारी, केदार जिरगे, सोमनाथ मेडके, विजयकुमार बरबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या आंबा महोत्सवामुळे धार्मिक आणि सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे परंपरा आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
