सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत पाणपोईची मागणी; शिवछत्रपती संघटनेचे आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकां साठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी शिवछत्रपती संघटनेच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन देण्यात आले.

शहरासह हद्दवाढ भाग आणि ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात. मात्र, रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याने अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित रुग्णांना ही बाब अधिकच त्रासदायक ठरत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची टाकी उभारून पाणपोई सुरू करण्यात यावी, जेणेकरून सर्वसामान्यांना मोफत स्वच्छ पाणी उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली.

या उपक्रमासाठी ज्योतिबा गुंड यांनी पुढाकार घेत आमदार कोठे यांची भेट घेतली. यावेळी शिवराज विभुते यांच्यासह शिवछत्रपती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!