जिजाऊ स्मारकासाठी तात्काळ निधी द्या; संभाजी महाराज पुतळ्यासाठी हायड्रोलिक शिडीची मागणी

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नियोजित स्मारकासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पणासाठी हायड्रोलिक अथवा एल-टाईप शिडीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर देवकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा किंवा स्मारक नसल्याची बाब अधोरेखित करत, सोलापूर महानगरपालिकेने चार हुतात्मा पुतळ्याजवळील मोकळ्या जागेवर स्मारकासाठी ठराव मंजूर केला असला तरी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या 12 फुटी भव्य छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे विविध कार्यक्रमांवेळी पुष्पहार अर्पण करताना हायड्रोलिक किंवा एल-टाईप शिडी उपलब्ध नसल्याने शिवभक्तांना पुतळ्यावर चढावे लागते. ही बाब धोकादायक असून अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे येत्या 14 मे रोजीच्या संभाजी महाराज जयंतीपूर्वी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद नागोरे, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी, शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर आदी उपस्थित होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!