सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरावर अचानक शोलकळा पसरली आहे. माजी महापौर तथा राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यासाठी गेले असता, गंगानदीमध्ये शाहीस्नान केल्यानंतर, अचानक थंडी वाजून रक्तगोठल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेले असतात उपचारापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान प्रयागराज उत्तर प्रदेश येथे महा कुंभमेळा संपन्न होत आहे. तब्बल बारा वर्षे म्हणजेच एक तपानंतर हा महाकुंभमेळा होत असतो. या कुंभमेळ्यास आपण देखील हजेरी लावावी यासाठी महेश अण्णा प्रयागराज येथे दाखल झाले होते. मात्र त्यांना हे ठाऊक नव्हते की, कुंभमेळा आपला शेवटचा मेळा ठरेल. त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूर शहरावर शोककळा पसरली आहे.
नेहमी हसतमुख, संयमी व मितभाषी असणारे अण्णा सर्व स्तरात प्रसिद्ध
पहिल्यापासूनच अभ्यासू संयमी व मितभाषी असणारे महेश अण्णा सर्वांच्या मनामनात होते. जरी राजकीय नातेसंबंध सांभाळून अनेकांशी त्यांचा जवळचा ऋणानुबंध होता. विविध शैक्षणिक संस्था उभारण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. आयटी पार्क सोलापुरात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील त्यांनी उराशी बाळगला होता. सोलापूर महापालिकेत महेश अण्णा यांचा दबदबा कायम होता. कोठे बोले महापालिका हाले असे चित्र वारंवार दिसून आले आहे. आपले वडील स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्या तालमीत तयार झालेले महेश यांना सोलापूरच्या राजकीय वर्तुळात प्रसिद्ध होते. त्यांच्या या अकाली जाण्याने राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात दुफळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून येण्यासारखी आहे. दरम्यान त्यांचे पार्थिव शरीर विमानाने सोलापुरात आणणार असल्याचे समजते. त्यानंतर महेश कोठे यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.