उत्तर कसब्यातील आप्पा उर्फ खंडू बन्नेवर कोयत्याने हल्ला, 10 जणांनी मिळून मारल्याने प्रकृती गंभीर, आरोपींवर 307 आणि इतर कलमाने गुन्हा दाखल
सोलापूर : प्रतिनिधी
देविदास दिगंबर बन्ने यांनी माहिती सांगितल्या प्रमाणे की, पुरुषोत्तम दिगंबर बन्ने वय 48 वर्षे यांचे वर्षे यांचे नावे बाळे, चोर लक्ष्मी जवळ मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील गट नं. 41/3 येथे 76 आर शेती आहे. आमचे शेती लगत शांतप्पा आडके राहणार देगांव ता. उत्तर सोलापूर यांची शेती आहे. शांतप्पा आडके याने आमचे शेती मध्ये अतिक्रमण केलेला होता. त्या कारणा वरुन आमचेत वाद चालु होता म्हणून त्या बाबत शांतप्पा आडके याने सोलापूर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा दावा क्र. रेमुनं 888/2012 असा होता. पुरुषोत्तम बन्ने याने देखील शांतप्पा आडके यांचे विरुध्द दावा दाखल केला असुन त्याचा रेमुनं 1948/2012 असा आहे. सदर दोन्ही दाव्याचा निकाल भाऊ पुरुषोत्तम याचे बाजुने लागला आहे. त्यानंतर शांतप्पा आडके हे अपील मध्ये गेले असुन त्याचा क्र. आरसीए 126/2022 व आरसीए 127/2022 असा आहे.
सदर अपील न्यायप्रविष्ठ आहेत. सदर शेत जमीनीची शासकिय मोजणी होणे करीता भाऊ पुरुषोत्तम बन्ने याने तालुका भूमी अभिलेख, उत्तर सोलापूर येथे अर्ज दिला होता. त्या प्रमाणे सदर कार्यालयाने आमचा अर्ज मंजुर करुन शासकिय शुल्क भरणा करणेस सांगीतले होते. त्या प्रमाणे भाऊ पुरुषोत्तम याने सदर शेत जमीनीचे मोजणीची रक्कम भुमी अभिलेख कार्यालयात भरले होते. भुमी अभिलेख कार्यालयाने सदर शेतीची मोजणी 21 जून 2024 रोजी ठेवली होती. भुमी अभिलेख कार्यालयाने वरील शेतीची मोजणी होणार असले बाबत शांतप्पा आडके पाठविली होती. 21 जून 2024 रोजी दुपारी 12.0के यांना नोटीस सामुनी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी श्री. तुपके व त्यांचा इतर स्टाफ असे मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील गट नं. 41/3 चे मोजणी करीता आले होते. त्यावेळी तेथे मी, माझा भाऊ पुरुषोत्तम, मित्र शैलेश सुरखा असे होतो. त्यावेळी भुमी अभिलेख कार्यालयाचे स्टाफने मोजणी करावयाचे शेती बाबत आमचेकडुन माहिती घेवुन दुपारी 12.30 वा. चे सुमारास मोजणी करायच्या तयारीत असताना शांतप्पा आड़के हा त्याचे हातात लोखंडी कोयता व सागर शांतप्पा आडके, बाळु आडके, यांनी त्यांचे हातात लोखंडी पाईप घेवुन ऊसाचे शेतातुन आमचे दिशेने येवुन ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही, या हरामखोरांना संपवु आज असे म्हणुन शांतप्पा आडके याने त्याचे हातातील कोयत्याने भाऊ पुरुषोत्तम च्या डोकित, दोन्ही हाता-पायावर, कमरेवर, शरीरावर वार करुन त्यास जखमी केले. तसेच सागर व बाळु आडके यांनी त्यांचे हातातील लोखंडी पाईपने पुरुषोत्तम यास मारहाण केल्याने तो जखमी अवस्थेत जमीनीवर पडला, त्यावेळी मी त्यास वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना शांतप्पा आडके याने ऊसा मध्ये लपुन बसलेल्या त्यांच्या इतर साथीदारांना हाक मारुन बोलावुन घेतले. त्यावेळी शेतातुन सुमारे 7 ते 8 अनोळखी इसम त्यांचे हाता मध्ये लोखंडी पाईप घेवुन पळत आमचे दिशेने आले व त्यांनी देखील मला व भाऊ पुरुषोत्तम यास लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी मी त्यांना माझ्या भावाला मारु नका असे म्हणत असताना बाळु आडके याने आज यांना सोडु नका, आपण कोण आहे ते दाखवु असे म्हणुन आम्हाला मारहाण करीत होता. त्यावेळी शैलेश सुरवसे याने सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यास बाळु आडके यांने तु मध्ये आला तर तुला पण खलास करीन म्हणुन दम दिला. सदरचा प्रकार बघुन शासकिय मोजणी करीता आलेला स्टाफ पळुन गेले.
भाऊ पुरुषोत्तम यास जास्त मारहाण होत असल्याने मी त्याचे अंगावर पडलो होतो. त्यावेळी शांतप्पा आडके याचे अनोळखी दोन इसमांनी मला धरुन बाजुला घेवून गेले व धरुन ठेवले. ते परत पुरुषोत्तम यास मारहाण करु लागल्याने मी पोलीस-पोलीस असे मोठ्याने ओरडु लागलो. त्यावेळी त्यांना पोलीस आले आहेत असे वाटल्याने ते सर्वजन पळुन गेले. आम्हाला मारहाण करणाऱ्या अनोळखी लोकांना मला दाखविल्यास मी त्यांना ओळखु शकतो. त्या नंतर मी मोबाईल क्रमांकावरुन 100 व डायल 112 ला फोन केलो. सदरचा फोन डायल 112 ला लागल्याने त्यांना वरील प्रकारा बाबत माहिती दिली. त्यानंतर मी माझा भाऊ हरी याचा मो.क्र. 9923879151 वर फोन करुन त्यास माहिती देवुन शेतीच्या ठिकाणी बोलावुन घेतले. भाऊ हरी हा थोड्या वेळातच रिक्षा घेवुन शेतात आला. त्याच रिक्षातुन भाऊ पुरुषोत्तम व मला उपचारा करीता सिध्देश्वर हॉस्पीटल, जुना पुणे नाका येथे आणले. माझ्यावर औषधोपचार झाल्यानंतर मला डिस्चार्ज केले आहे. माझा भाऊ पुरुषोत्तम हा गंभीर जखमी असल्याने त्यास सिध्देश्वर हॉस्पीटल येथे प्राथमिक उपचार घेवुन त्याची प्रकृती गंभीर असल्याने वळसंगकर हॉस्पीटल येथे ऍडमिट केले असुन त्याचेवर उपचार चालु आहेत.
तरी 21 जून 2024 रोजी दुपारी 12.30 वा. चे सुमारास मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील गट नं.41/3 या शेता मध्ये शासकिय मोजणी करीत असताना शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके यांनी त्याचा राग मनात धरुन ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही, या हरामखोरांना संपवु असे म्हणुन शांतप्पा आडके, सागर शांतप्पा आडके, बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इतर 7 ते 8 इसम असे सर्वांनी एकत्रीत येवुन त्यांचे हातातील लोखंडी कोयता, लोखंडी पाईपने भाऊ पुरुषोत्तम याचे डोकिस, दोन्ही हाता-पायावर, कमरेवर, शरीरावर वार करुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मला लोखंडी पाईपने उजव्या खांद्यावर तसेच डाव्या पायाचे पिंडरीवर मारहाण करुन जखमी केले म्हणुन माझी शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इतर 7 ते 8 इसम यांचे विरुध्द तक्रार दिली. पुढील तपास- सपोनि गायकवाड फौजदार चावडी पोलिस स्टेशन हे करत आहेत.