डॉ. हेगडेवार पटांगणात घुमला “जय श्रीरामांचा” नारा, श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला जनकल्याणार्थ १५१ हवन कुंडीय यज्ञ.
सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी दिली ग्वाही.
सोलापूर : प्रतिनिधी
अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगम व श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दाजी पेठ येथील डॉ. हेगडेवार पटांगण येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी १५१ हवन कुंडीय कार्यक्रम संपन्न झाले. हा सोहळा गेल्या ४० वर्षापासून मौन व्रत असलेले तपस्वी गुरुवर्य श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मुख्य पुजारी व संत चोळाप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या पुरोहित्यात हा सोहळा संपन्न झाला.
प्रारंभी यावेळी अयोध्या येथील श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतीरुप असणाऱ्या मूर्तीची यावेळी विधीवत पूजन होऊन या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर लोकसभा महायुतीचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे, माजी महापौर महेश कोठे, शिवव्याख्याते शिवरत्न शेट्टे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य संजय साळुंखे, श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक सदस्य अक्षय अंजीखाने, यतिराज होनमाने, संजय होमकर, श्रीनिवास संगा, अमर बिराजदार, सुधीर बहिरवाडे, चन्नवीर चिट्टे, सोमनाथ केंगनाळकर, संदीप महाले यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.