सामाजिकमहाराष्ट्रराजकीयसोलापूर

“एक बाटली, पाणी झाडासाठी” या लोक सहभागाचा आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते शुभारंभ

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महापालिका आवारातील बागेतील झाडांना आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे आणि परसबाग सोलापूरचे मुख्य प्रवर्तक नारायण पाटील यांच्या हस्ते बाटलीनें पाणी घालून एक बाटली पाणी झाडासाठी या लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान, सोलापूर महानगरपालिका आणि परसबाग सोलापूर यांचा हा संयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

ऐन कडक उन्हाळ्यात सोलापूर शहरामध्ये विविध माध्यमातून वृक्षारोपण केलेल्या रोपांना लोक सहभागातून नियमितपणे पाणी मिळावे व त्याचे संवर्धन व्हावे तसेच या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या हेतूनें हा उपक्रम हाती घेण्यात येत असुन नागरिकांनी स्वयंप्रेरणेने या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांचेकडून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस परसबागचे प्रतिनिधी शिरीष गोळवलकर यांनी सर्वांचे स्वागत केले. तद्नंतर नारायण पाटील यांनी या उपक्रमाची संकल्पना विषद केली. डॉ.भारत मुळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांना देशी वृक्षाची रोपे भेट देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर, परसबाग च्या सहप्रवर्तिका शुभदा पाटील, समन्वयक शिरीष गोळवलकर,

स्मिता देशपांडे, पवन देसाई, प्रकाश कुलकर्णी, विजयानंद स्वामी, डॉ. सर्जेराव दौलतोडे, श्रीशैल स्वामी, सुप्रिया जक्कल, इको क्लबचे मनोज देवकर, काशिनाथ भतकुणगी, अनिल मुतालिक देसाई, अविनाश बेंजरपे, महेंद्र आठवले, सुप्रिया ठाणे, अनिता कोळी, स्नेहश्री देसाई, यांच्यासह अनेक उपस्थितांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!