श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट, आयुक्तांनी थेट कॉल करत 15 मे पूर्वी सर्व काम करण्याचा दिला आदेश

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे या संदर्भातले निवेदन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना देण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी शिवशंभु प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन लागलीच नगर अभियंता सारिका अकुलवार यांना फोन लावून पुतळा सुशोभीकरण विषयाची माहिती घेतली.
त्याच बरोबर दिनांक 15 मे पूर्वी कोणतीही सबब न देता काम पूर्ण करण्याच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरला देण्याची तसेच नगर अभियंता यांनी सदर काम 15 मे पर्यंत पूर्ण करावे असे सांगत कामासाठी डेडलाईन दिली. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डॉ.सचिन ओंबासे यांच्या तात्काळ कार्यवाहीबद्दल च्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, श्रीकांत घाडगे, ज्ञानेश्वर सपाटे, श्रीकांत डांगे, विश्वनाथ गायकवाड, गणेश डोंगरे, सचिन स्वामी, विजय पुकाळे, देविदास घुले यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.