सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
प्रणिती शिंदे यांची महायुतीवर सडकून टीका, जनतेचा कौल महाविकास आघाडीला असल्याचे मत केले व्यक्त
सोलापूर : प्रतिनिधी
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेली दगडफेक, विनोद तावडे यांनी केलेले पैसे वाटप अशा प्रकारामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील आमच्या बाजूने लोकांचा कल वाढत आहे. साम, दाम, दंड, भेद, ED, या सर्व गोष्टींचा वापर भाजप करत असून देखील लोकशाहीचा विजय होतोय. लोकांचा कल आमच्या बाजूने दिसत आहे. ही निवडणूक असेल किंव्हा मागील निवडणूक असेल महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी महत्वाची निवडणूक आहे.
महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र विकला गेलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि उलट शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात, त्यांना थोडी तरी काहीतरी माणुसकी असायला पाहिजे पण ती दिसत नाही हे लोकांना कळून चुकले. त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात ठरवले महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची.