योगेश पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय छावाच्या शिबिरात 156 जणांचे रक्तदान, चौदा वर्षात केले 1796 लोकांनी रक्तदान
सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्याने दरवर्षी प्रमाणे 27 डिसेंबर 2023 रोजी, राष्ट्रीय छावा संघटना व शिवसंदेश ग्रुपच्यावतीने पारस ईस्टेट, नवी पेठ येथे अक्षय ब्लड बँकेमार्फत घेतलेल्या रक्तदान शिबीरांस चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यात 156 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेषता प्रथमत: रक्त देणार्या युवक-युवती व महिला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच गेल्या 14 वर्षापासून योगेश पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसंदेश ग्रुप व राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.
यावेळीही हितचिंतक व नियमित रक्त दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले. राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे घेतलेल्या तेरा वर्षांच्या रक्तदान शिबिरात पुढीलप्रमाणे वर्षंनिहाय रक्तदान झालेले आहे.
2011 साली 123 रक्तदान, 2012 साली 127 रक्तदान,
2013 साली 112 रक्तदान, 2014 साली 117 रक्तदान,
2015 साली 96 रक्तदान, 2016 साली 102 रक्तदान,
2017 साली 154 रक्तदान, 2018 साली 112 रक्तदान,
2019 साली 185 रक्तदान, 2020 साली 132 रक्तदान,
2021 साली 115 रक्तदान, 2022 साली 112 रक्तदान,
2023 साली 153 रक्तदान, 2024 साली 156 रक्तदान,
याप्रमाणे तेरा वर्षांमध्ये राष्ट्रीय छावा संघटना व शिवसंदेश ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरांत एकूण 1796 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिनाथ परांडकर, सचिन गुळग, राहुल गोयल, रतिकांत पाटील, संजय पारवे, गणेश मोरे, विश्वजित चूंगे, विष्णु माने, नागेश घोरपडे, भीमराव जाधव, बाळू लोंढे, आनंद नरळे, रवी गोयल, गणेश जाधव, आरिफ शेख,
विशाल पवार, दत्ता जाधव, रसूल पठाण, आकाश देवकुळे,संजय फुलारी, इम्रान शेख, हरी कोळेकर, धनंजय जाधव, संतोष गुंड, सागर काटकर, मनोहर गोयल, प्रविण भडंगे, ओंकार लोखंडे, गणेश घोडके, आदित्य रजपूत, राजू माने, विनोद पवार, प्रमोद लोखंडे, सादिक पिरजादे, उमेश पवार, संदेश लोखंडे, अभिषेक राजपूत आदीनी परिश्रम घेतले.