नव्या व्हायरसच्या रुग्णांसाठी चार बेड आरक्षित, आरोग्य यंत्रणा सज्ज, कोणीही घाबरून जाऊ नये : डॉ. संजीव ठाकूर
सोलापूर : प्रतिनिधी
चीनमध्ये गेल्या काही दिवसांत वेगाने पसरणाऱ्या एचएमपीव्ही (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. हा व्हायरस धोकादायक नसला तरी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. यासाठी आता छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात चार बेड तयार करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
दरम्यान, नव्या व्हायरस हा धोकादायक नाही. हा पूर्वीपासून आढळतो. पण तरीही काळजी म्हणून छत्रपती शिवाजी रुग्णालयात लहान मुलांसाठी २ आणि ज्येष्ठांसाठी २ बेड रिझर्व्ह ठेवण्यात आले आहेत. शिवाय ऑक्सिजन बेड, औषधे, तपासण्यासाठी विविध यंत्रणा ही तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली आहे. तरी यासाठी वेळोवेळी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत.
आपल्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. ऑक्सिजन, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शिवाय तज्ज्ञ डॉक्टर ही उपलब्ध आहेत. हा व्हायरस धोकादायक नाही, पण तरीही काळजी म्हणून ही तयारी करण्यात आलेली आहे.
– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठता