सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
अनंत नेता यांच्या कार्यालयास पालकमंत्री गोरे यांनी दिली भेट, नेता आणि गोरे यांच्यात बऱ्याच विषयावर चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी माजी नगरसेवक तथा भाजपाचे नेते आनंत जाधव यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार जाधव यांनी केला यावेळी भाजप आमदार देवेंद्र कोठे हेही उपस्थित होते त्यांचाही सत्कार जाधव यांनी केला.
यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी सोलापूर शहरातील अनेक सामाजिक प्रश्न, मराठा समाजातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मांडत अनेक समस्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडल्या यावर पालकमंत्री गोरे म्हणाले आपले सर्व प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक अविनाश पाटील, विनायक विटकर, आदी संघ भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.