सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
अनंत जाधव, शशी थोरात, हेमंत पिंगळे, राजू माने, चणवीर चिट्टे, रुद्रेश बोरामणी, भाजपा शहर अध्यक्ष पदासाठी इच्छुक

सोलापूर : प्रतिनिधी
भाजपमध्ये अंतर्गत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नुकत्याच राज्यातील सर्व मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. आता नव्या शहराध्यक्षाच्या निवडीचे वेध लागले आहेत. एप्रिल अखेर नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती केली जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. भाजपच्या आतापर्यंत झालेल्या शहराध्यक्ष निवडीत आम्हाला संधी दिलेली नाही.
भाजप पक्ष निरीक्षक नीता केळंकर, राजेश पांडे, हे सोलापुरात दाखल झाले असून लागलीच भाजपा शहर अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे अनंत जाधव, शशी थोरात, हेमंत पिंगळे, राजू माने, चणवीर चिट्टे, रुद्रेश बोरामणी, यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ दिले आणि आम्ही देखील शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून आम्हाला संधी मिळावी अशी मागणी केली.