राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10 सोलापूरच्या ताफ्यात नवीन 11 वाहने दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10, सोलापूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे वेळोवेळी कायदा व सुव्यवस्था, आंतर सुरक्षा व नक्षल बंदोबस्ताकरीता संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर जात असतात. पोलीसांना बंदोबस्ताकरीता जाण्या-येण्यासाठी वाहनांची आवश्यकता असल्याने सोलापूर जिल्हयाचे मा. पालकमंत्री व मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्हा नियोजन विभाग, सोलापूर यांचे सन 2024-25 या वित्तीय वर्षामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10, सोलापूर या गटासाठी नवीन 10 महींद्रा बोलेरो व 01 इरटिगा वाहन असे एकुण 11 नवीन वाहनांकरीता निधी उपलब्ध करून देवून मोलाचे सहकार्य केलेले आहेत.
दि.24.04.2025 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10, सोलापूर येथील मुख्य कवायत मैदानावर गटाचे समादेशक श्री पंकज अतुलकर (भा.पो.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 नवीन वाहनांची महींद्रा व सुझुकी मोटार्स यांचे सेल्स मॅनेजर यांचे हस्ते सदरील 11 वाहनांची हस्तांतरण सोहळा संपन्न झाला असून राज्य राखीव पोलीस बलास आता बंदोबस्तास वेळेत पोहचण्यास त्याच लाभ होणार आहे.
सदर प्रसंगी विजय मिठारी-जनरल मॅनेजर महींद्रा मोटार्स, ज्ञानेश्वर जाधव-मॅनेजर महींद्रा मोटार्स, मुलाणी-टिम लिडर, हेमंत गरड सेल्स मॅनेजर मारुती सुझुकी मोटार्स, फैजल कादरी-टिम लिडर, गटाचे समादेशक सहायक नानासो मासाळ, सहायक समादेशक महेश मते, पोनि-अंबर निंबाळकर, पाटील, धनवे, गायकवाड, तसेच पोनि-कल्याण कार्यालयाचे स्टाफ- प्रविण माने, गजानन मेटकरी, अतूल माळी हे उपस्थित होते.